जळगाव- तरुण मुलाचा मोबाईलसह पैशांचा लाड पुरविणे शहरातील रामानंदनगर परिसरातील शिक्षक पित्याला चांगलेच महागड पडले आहे. ऑनलाईन गेम खेळण्यात सहा लाख हरल्यानंतर पित्याने रागविल्याने पैशांसाठी शिक्षक पुत्राने कॉलनीतील एका चिमुकल्याच्या गळ्याला चाकू लावत खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी समोर आला आहे. चिमुकल्याच्या आईने आरडाओरड केल्याने परिसरातील तरुणांनी संबंधित शिक्षकपूत्र तरुणाला चोप देत रामानंदनगर पोलिासांच्या स्वाधीन केले होते. दरम्यान याप्रकारामुळे पोलीस कर्मचारीही थक्क झाले होते.
रामानंदनगर परिसरातील रहिवासी शिक्षक शहरातीलच एका शाळेत शिक्षक आहेत. त्यांचा मुलगा रायसोनी महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या तिसर्या वर्षाला शिक्षण घेत आहे. शिक्षकाकडून मुलाचे लाड पुरविले जात असल्याने अनेकदा पैसे काढण्यासाठी थेट एटीएमकार्ड देण्यात आले. यात माझ्यासाठी खात्यावरुन पैसे काढून आण आणि तुला काही लागले तरी तुही काढून घे, अशा पध्दतीने शिक्षकाकडून मुलाचे लाड पुरविणे सुरु होते. या
पैशांचे लाड पुरविणे शिक्षकाला भोवले
महागड्या मोबाईल खेळाची शिक्षकाच्या मुलाला चांगलीच भुरळ पडली. या भुरळपाही तरुण मोबाईल खेळात चक्क पित्याचे खात्यावरील सहा लाख रुपये गमावून बसला. वडीलांना प्रकार लक्षात आल्यावर तरुण सदरचे पैसे परत येतील अशा भुलथापा शिक्षक पित्याला देत होता. मात्र पित्याने एक न एैकून घेता काहीही कर मला पैसे आणून दे असे म्हणत मुलांवर संताप काढला.
पैशांसाठी तरुणाकडून खंडणीची शक्कल
वडीलांनी संताप केल्याने त्याचे वाईट वाटल्याने तरुणाने पैसे मिळविण्यासाठी खंडणीची शक्कल लढविली. तोंडाला रुमाल बांधून तरुण रामानंदनगर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या यशश्री रेसीडेन्सीमध्ये थेट एका घरात शिरला. याठिकाणी सात ते आठ वर्षाच्या चिमुकल्याला उचलून घेत चाकूचा धाक दाखवित आईला घरात जेवढे पैसे असलील तेवढे घेवून असा दम भरला. घाबरलेल्या आईने आरडाओरड केल्याने बोंब फुटली. खाली असलेल्या तरुणांनी सदर तरुणाला पकडून चोप देत पोलीस ठाण्यात आणले. याठिकाणी संबंधित तरुण हा विद्यार्थी असल्याने त्याचे शैक्षणिक नुकसान होईल तसेच तो संशयित प्रवृत्तीचा नसल्याने महिलेने तक्रार न दिल्याने वादावर पदडा पडला. पोलिसांनी शिक्षक पित्याला बोलावून घेत समजूत घातली. त्यावेळी सहा लाखांसाठी हे कृत्य केल्याचे समोर आले. मुलाचीही यावेळी समजूत काढण्यात आली.