लाड शाखीय वाणी समाज ट्रस्टच्या ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमात श्रोते मंत्रमुग्ध

0

समाजसेवकांच्या सत्काराने भारावले जेष्ठ : एकामागून एक सरस अभंगांनी रसिक तृप्त

चाळीसगाव- लाडशाखीय वाणी समाज सेवाभावी चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने शहरातील वाणी मंगल कार्यालयात दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.संस्थापक वसंत वाणी, ट्रस्टचे अध्यक्ष योगेश भोकरे, उपाध्यक्ष बी.के.वाणी, समाजाचे अध्यक्ष शरद मोराणकर, डॉ.विनोद कोतकर, डॉ.प्रशांत शिनकर, डॉ.देविदास धामणे, संजय ब्राह्मणकर, निलेश कोतकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ.विनोद कोतकर यांनी आरोग्यविषयक मार्गदर्शन करीत ट्रस्टच्या आजवर झालेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले तसेच दिवाळी पहाट हा कार्यक्रम अविस्मरणीय असल्याचे सांगितले. दिवाळी सण म्हटले की सर्वत्र रंगीबेरंगी रोषणाई,रांगोळी,पणत्या व फराळ आलेच.या

बहारदार गीतांनी रसिक मंत्रमुग्ध
या व्यतिरिक्त दिवाळी पहाट हा कार्यक्रम खरोखरच मनाला या सणाची खरी ओळख करुन देतो.रामप्रहरी सप्तसूर आपल्या कानी पडल्यावर खरोखरच अगदी मन प्रसन्न होऊन जाते.किशोर गुरव यांनी आपल्या जादूई सुरांनी सर्वाना मंत्रमुग्ध केले तर विविधरंगी कलाविष्कार सादर केलेत,विद्या भोई, गायत्री चौधरी, पवन गुरव आदींनी गायनाने उपस्थितांचे मनोरंजन केले. ‘माझे माहेर पंढरी’, ‘अबीर गुलाल उधळीत रंग’, ’आळंदी वंदीन’, ’विघ्नेश्वर तु वरदविनायका’ यासारख्या गीतांनी दिवाळी पहाट सुरमयी झाली. बहारदार गीतांनी रसिकांना मंत्रमुग्ध करीत उपस्थितांची मने जिंकलीत.आपल्या भक्तीमय गीताने सर्वांना आनंददायी मेजवानी दिली यात पुष्कर सुर्यवंशी,भूषण घोडके आदींची साथ लाभली. यावेळी समाजसेवा करणार्‍या समाजबांधवाचा व ट्रस्टसाठी दातृत्व देणार्‍या दात्यांचा सन्मान करण्यात आला. यात राजेंद्र अमृतकार, दत्तात्रय वाणी, सुरेश पाचपुते, महेश वाणी, जितेंद्र शिरोडे, श्रीधर फुलदेवरे, स्वप्निल कोतकर यांना समाजसेवेबद्दल गौरविण्यात आले तर केशव कोतकर, अशोक ब्राह्मणकार, डॉ.विनोद कोतकर, किशोर ब्राह्मणकार, विजय पाखले, प्रभाकर पिंगळे, जयवंत पिंगळे, संतोष शिनकर, भद्रा मारोती गृप आदींचा दातृत्वाबद्दल सत्कार करण्यात आलाफ कार्यक्रमाचे प्रास्ताविक योगेश भोकरे यांनी तर ट्रस्टच्या कार्याची माहिती प्रा.बी.आर.येवले यांनी दिली सुत्रसंचालन कैलास पाखले यांनी केले तर आभार विजय भामरे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी भालचंद्र सोनगीरे,केशव गोल्हार,दिलीप येवले,विठ्ठल गोल्हार,अनिल कोतकर,हिरालाल शिनकर,सतीश देव,जयवंत कोतकर,हरिश्चंद्र पिंगळे,पुरुषोत्तम ब्राह्मणकार,प्रकाश अमृतकर,मनोज शिरोडे,गजानन कोतकर,प्रशांत बागड यांनी परिश्रम घेतले दामोदर स्त्रोत्र व दिपदानाने कार्यक्रमाची सांगता झाली तर 5 भाग्यवंतांना आकर्षक दिवाळी भेट देण्यात आली.