लातूर : लातूर – बार्शी रस्त्यावरील मुरुड अकोला या गावाजवळ पुलावरून कार कोसळून पाच जणांचा जागीच मृत्यू तर दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात सोमवार दि. १७ रोजी दुपारी पावणेतीन च्या सुमारास झाला. अपघातातील मृत सर्वजण डिकसळ (ता. कळंब) येथील रहिवासी असल्याचे समजते.
डिकसळ येथील सात जण कारने लातुरकडे विवाहासाठी येत होते. मुरुड अकोला गावाच्या पश्चिमेला ज्योतिबा मंदिराच्या जवळ असलेल्या पुलावरून कार पंधरा फूट खोल खड्ड्यात कोसळली. या अपघातात कारमधील पाच जण जागीच ठार तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना येथील सर्वोपचार केंद्रात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. ज्ञानेश्वर खंदारे, परमेश्वर अंबिरकर, गणेश सोमसे, जगन्नाथ पवार व नाना शिंदे अशी मयताचे नावे आहेत. जखमीत श्रीकांत अंबिरकर व दत्तात्रय जाधव यांचा सामावेश आहे.