लातूर जिल्ह्यात आईच्या चितेशेजारीच मुलाची आत्महत्या

0

लातूर : आईच्या चितेशेजारीच मुलाने चारचाकीवर डिझेल टाकून गाडीसह स्वत:ला पेटवून घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. हि घटना लातूर जिल्ह्यात रविवारी रात्री घडली असून मृत युवकाचे नाव गजानन कोडलवाडे (वय ३८) असे आहे. दरम्यान त्याने आत्महत्या का केली हे अद्याप समजू शकलेले नाही.

प्राप्त माहिती अशी, गजानन कोडलवाडे हा खासगी वाहन चालक आहे. त्याची दोन लग्नं झाली होती. तीन दिवसांपूर्वी त्याच्या आईचा मृत्यू झाला होता. पण रविवारी रात्री अचानक गजानन हा अहमदपूर तालुक्यातील चोबळी रस्त्यावरील शिरूर ताजबंद शिवारात गेला. येथील स्मशानभूमीत त्याच्या आईवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. आईच्या चितेशेजारीच त्याने आपल्याबरोबर आणलेल्या स्कॉर्पियोवर डिझेल टाकले आणि स्वत:ला गाडीत कोंडून पेटवून घेतले. यात १०० टक्के होरपळून त्याचा जागीच मृत्यू झाला. गजानने आत्महत्या का केली याची अद्याप माहिती समजू शकली नाही. या घटनेचा अहमदपूर पोलीस तपास करत आहेत.