लादेन अन्सारीला पोलीस कोठडी

0

लोणावळा : शिवसेनेच्या गटनेत्या नगरसेविका शादान चौधरी व उद्योजक प्रकाश हजारे यांच्याकडे खंडणी मागितल्या प्रकरणी दोन्ही मुलांसह फरार असलेला रियाज उर्फ लादेन अन्सारी (रा. कैलासनगर, लोणावळा) याला लोणावळा शहर पोलिसांनी मंगळवारी सापळा रचत अटक केली. वडगाव न्यायालयात त्याला आज दुपारी हजर केले असता न्यायालयाने लादेनला 10 दिवसांची (17 मार्चपर्यंत) पोलीस कोठडी दिली आहे. लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्‍वर शिवथरे व पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शितोळे, सहाय्यक फौजदार थोरात, पोलीस नाईक श्रीशैल कंटोळी, वैभव सुरवसे, प्रशांत खुटेमाटे यांच्या पथकाने ही कारवाई केली. लादेन याची दोन मुले व या दोन्ही घटनांमधील मुख्य आरोपी आमन रियाज अन्सारी व रिहान रियाज अन्सारी हे अद्याप फरार असून त्यांचा शोध लोणावळा पोलीस घेत आहेत.