लाभधारकांनी कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन

0

मुक्ताईनगर। शासनातर्फे राबविल्या जाणार्‍या संजय गांधी व श्रावण बाळ योजनेंतर्गत तालुक्यातील लाभधारकांनी आपली कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेेष सहाय्यक विभागामार्फत राबविण्यात येणार्‍या राज्य पुरस्कृत संजय गांधी व श्रावण बाळ योजनेंतर्गत तालुक्यातील ज्या लाभार्थ्यांनी आपल्या बँक खात्यांची तसेच आधार कार्डची छायांकित प्रत जमा करायची राहिली आहेे अशा लाभार्थ्यांनी त्या 15 मार्चपर्यंत तलाठ्यांकडे किंवा तहसिल कार्यालयातील संजय गांधी विभागात जमा करावी. अन्यथा अशा लाभार्थ्यांचे अनुदान 1 एप्रिलनंतर बंद होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे तहसिलदार जितेंद्र कुंवर यांनी सांंगितले.