तळोदा । लाभार्थ्यांच्या प्रकरणातील त्रृटींची तातडीने पुर्तता करुन त्या अर्जांवर कार्यवाही करावी, कोणताही लाभार्थी योजनांपासून वंचित राहू नये अशा सूचना आमदार उदेसिंग पाडवी यांनी तळोदा तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा बैठकीत केल्या. यावेळी 224 लाभार्थ्यांचे प्रकरण मंजूर करण्यात आले.
486 लाभार्थ्यांचे अर्ज प्राप्त
तळोदा तालुकास्तरीय संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची बैठक मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत आमदार उदेसिंग पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी समितीचे सदस्य तहसीलदार योगेश चंद्रे, गट विकास अधिकारी शरद मगर, अनुप उदासी, नितीन पाडवी, राजेंद्र राजपूत, रशीलाबेन देसाई, यशवंत पाडवी तसेच संजय गांधी निराधार योजनाच्या नायब तहसीलदार एस. पी. गंगावणे, ब्राम्हणे, दीपक चौधरी, प्रसाद बैकर आणि महसूल कर्मचारी उपस्थित होते.
141 अर्ज नामंजूर
यावेळी संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी विधवा योजना अशा विविध योजनांतून 486 लाभार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले होते, त्यांपैकी 224 अर्ज मंजूर करण्यात आले. त्यापैकी 141 अर्जात त्रुट्या आढल्याने ते नामंजूर करण्यात आले आहेत. 124 अर्जातील त्रुट्यांचे लाभार्थीकडून पूर्तता करुन, पुढील बैठकीत यांवर विचार करण्यात येणार आहे. यावेळी लाभार्थ्यांच्या प्रकरणातील त्रुटींची पुर्तता करा, त्रुटी असलेल्या अर्जांवर तातडीने कार्यवाही करा कोणताही लाभार्थी योजनांपासून वंचित राहू नये, अशा सूचना आमदार उदेसिंग पाडवी यांनी यावेळी दिल्या.