लाभार्थ्यांना मोफत सायकलींचे वाटप

0

नवापूर। श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात मानव विकास मिशन योजने अंतर्गत इयत्ता आठवी ते दहावी च्या एकुण 27 लाभार्थी विद्यार्थीनीना मोफत सायकली वाटप जेष्ठ संचालक केशव पाटील, भरत पाटील, महेद्र चव्हाण, धमु पाटील,निर्मल थोरात यांच्या हस्ते झाले. यावेळी प्राचार्य आर व्ही पाटील, उपमुख्याध्यापक अनिल पाटील, उपप्राचार्य एस आर पहुरकर,पर्यवेक्षक प्रवीण पाटील, विनोद पाटील, कमल कोकणी, बी आर पाटील आदि उपस्थित होते.

याप्रसंगी ग्रामीण भागातून शाळेत ये जा करणार्‍या 27 मुलींना मोफत सायकलीचे वाटप करण्यात आले. शासनाने मुलींना शिक्षणात गैरसोय होऊ नये म्हणून ग्रामीण भागातील मुलींना येण्या जाण्याची गैरसोय टाळता यावी. म्हणून शासनाने ही योजना सुरू केली आहे. ज्या लाभार्थी मुलींना सायकली मिळाल्या आहेत. त्यांनी नियमित शाळेत येऊन सायकलीच्या योग्य तो उपयोग करून शिक्षण पूर्ण करावे आवाहन असे यावेळी उपस्थित मान्यवरांनी केले. याप्रसंगी लाभार्थी मुलींचे पालक यावेळी उपस्थित होते. सायकली मिळाल्याने मुलींचा चेहर्‍यावर आनंद दिसुन येत होता. यावेळी शिक्षक, कर्मचारी आदी उपस्थित होते.