लाभ हस्तांतरण व खरीप हंगामपूर्व निविष्ठा विक्रेत्यांचे प्रशिक्षण यशस्वी

0

नंदुरबार। जिल्ह्यातील सर्व तालुक्यात खरीप हंगामपूर्व कृषि निविष्ठा विक्रेते व रासायनिक खते थेट लाभ हस्तांतरण प्रशिक्षणाचे आयोजन दि 15 मे ते 16 मे या दोन दिवस पंचायत समिती शहादा, तळोदा, नंदुरबार या ठिकाणी केले होते. सदर प्रशिक्षणावेळी कृषि निविष्ठा विके्रत्यांनी शेतकर्यांकरीता चांगल्या प्रतिच्या, योग्य दरात व मुबलक प्रमाणात निविष्ठा प्राप्त करून द्याव्यात अशी सूचना देण्यात आली.

शेजारील राज्यात निविष्ठा विक्री करू नये
विक्रेत्यांनी आपल्या विक्री केंद्राचा परवाना दर्शनीय भागात लावणे, भावफलक व साठाफलक दर्शनीय भागात लावणे व वेळोवेळी अद्ययावर करणे, विक्री रजिस्टर, साठा रजिस्टर अद्यावत ठेवणे, खरेदी पावती विहित नमुन्यात देवून शेतकर्यांची स्वाक्षरी घेणे, प्रिंसीपल सर्टीफिकेट, ओ फॉर्म कृषि विकास अधिकारी कार्यालयाकडून मंजुर करून घेणे, जादा दराने निविष्ठांची विक्री न करणे मुदतबाह्य निविष्ठा विक्री न करणे, मासिक विक्री अहवाल वेळोवेळी सादर करणे, शेजारील राज्यात निविष्ठांची विक्री न करणे, लिंकींग न करणे याबाबतच्या सूचना मोहीम अधिकारी पी.बी.शेंडे यांनी निर्गमीत केल्या. तसेच शेतकर्‍यांनी तापमान कमी झाल्यानंतरच कपासची लागवड करावी, असे मार्गदर्शन करून चालू वर्षी भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून सरासरीच्या 96 टक्के पावसमान असल्याचे शेंडे यांनी सांगितले.

आधार क्रमांक आवश्यक
या प्रशिक्षणावेळी 1 जुन 2007 पासून रासायनिक खतांची विक्री ही थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने अनिवार्य होणार आहे. याबाबत कृषी विभाग, जि.प.नंदुरबार व कृभको, इफको, आरसीएफ या कंपन्यांचे प्रतिनिधी यांचेकडून देण्यात आले. याकरीता शेतकर्‍यांना आधार क्रमांक शिवाय रासायनिक खते मिळणार नाहीत असे सांगितले. यावेळी कृषी विकास अधिकारी यु.एस.पाटील, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक ए.एस.तायडे, शहादा पं.स.कृषि अधिकारी ए.जी.कागणे उपस्थित होते. या प्रशिक्षणावेळी श्री.साठे, कृषी अधिकारी बी.जे.महिरे, ए.ए.पाटील यांनी उपस्थित राहून प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजन करून उपस्थितांचे आभार मानले.