लायन्सच्या नवीन पदाधिकार्‍यांची निवड घोषित

0

शहादा । लायन्स इंटरनॅशनल क्लब ऑफ शहादा यांच्या स्थापना दिनी नवीन पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी डॉ. तेजल चौधरी तर प्रमुख पाहुणे म्हणुन उपनगराध्यक्षा रेखा चौधरी , नगरसेवक संदिप पाटील, हिना रघुवंशी , सुप्रिया कोतवाल उपस्थित होत्या. याप्रसंगी शहादा क्लब चार्टर प्रेसिडेंट म्हणुन डॉ. सरोज कुलकर्णी , उपाध्यक्ष डॉ. विजय कलाल , कोषाध्यक्ष पंकज गुजराथी, सचिव राजेंद्र शहा सह कोषाध्यक्ष प्रिती गुजराथी , डायरेक्टर अलका जोंधळे , प्राचार्य आय. बी. चौधरी यांची निवड करण्यात आली.

यावेळी सुप्रिया कोतवाल , हिना रघुवंशी, प्रा. आय. बी. चौधरी यांनी देखील मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे उद्घाटन दिपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या सत्कार करण्यात आला. यशस्वीतेसाठी नुरी अंसारी , अनामिका चौधरी, राजेश कुलकर्णी , चेतना गुजराथी , आरती वाणी, डॉ. संगिता कलाल, संतोष परदेशी आदिंनी कामकाज पाहिले. सुत्रसंचालन व आभार विष्णु जोंधळे यांनी केले.