लायन्सने केली पोलिसांची आरोग्य तपासणी 

0
पिंपरी : लायन्स क्लब ऑफ पुणे सफायरच्यावतीने महात्मा गांधी जयंतीनिमित्ताने पोलिसांसाठी आयोजित केलेल्या आरोग्य तपासणी महाशिबिरात 250 जणांची तपासणी करण्यात आली. चिंचवड येथील पिंपरी पोलीस ठाण्यात हा कार्यक्रम पार पडला. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी आंतरराष्ट्रीय लायन्स क्लबचे प्रांतपाल रमेश शहा, उप प्रांतपाल ओमप्रकाश पेठे, आनंद मुथा, सत्येन भास्कर, सफायर क्लबच्या अध्यक्षा सरला जॉय, आयोजक अब्दुल जाफर, हरिदास नायर, जॉय जोसेफ, व्ही.एम.कबीर, राजन नायर आदी उपस्थित होते.
कृृतज्ञता म्हणून शिबिर
यावेळी शहा म्हणाले की, पोलीस कर्मचारी जागतात तेव्हाच समाजातील नागरिक शांत झोपतात. सण उत्सवाच्या काळात ते 12-12 तास ड्युटी करतात त्यांच्या प्रति कृतज्ञता म्हणून लायन्स क्लबने हे शिबीर आयोजित केले होते. यावेळी रक्तदाब, मधुमेह, दंत, नेत्रतपासणी, इसीजी, अस्थी, कान-नाक-घसा, कर्करोग तपासणी, पोलीस व त्यांच्या कुटुंबियांची तपासणी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के.हरि नारायणन यांनी तर आभार बिनॉय जाफर यांनी मानले. या शिबिरासाठी आधार रक्तपेढीचे मकरंद शहापूरकर, आस्था रुग्णालयाचे डॉ. शयाम शिंदे, डॉ.सरिता सोनावळे, सत्येंद्र पांडे यांचे सहकार्य लाभले.