लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी अविनाश गांधी यांची निवड

0

लोणावळा – लायन्स क्लब ऑफ लोणावळाच्या अध्यक्षपदी नुकतीच अविनाश गांधी यांची निवड करण्यात आली. माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर राजकुमार राठोड व माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर दिपक शहा यांच्याहस्ते हा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव, झोन चेअरमन लायन आनंद खंडेलवाल, रिजन चेअरमन हेमंत अगरवाल, डॉ. हिरालाल खंडेलवाल हे उपस्थित होते.

लायन्स क्लब लोणावळ्याच्या सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांना शपथ दिली. मागील अनेक वर्षांपासून लायन्स क्लब लोणावळा शहरात व आजुबाजुच्या ग्रामीण भागात विविध सामाजिक व विधायक उपक्रम राबवत आहेत. पुढिल वर्षभराच्या कार्यकाळात देखिल भरिव काम करत लोणावळा लायन्स क्लबचे नाव सर्व क्लबमध्ये कार्याच्या माध्यमातून मोठे करु असा विश्‍वास यावेळी अविनाश गांधी यांनी व्यक्त केला. कार्यक्रमा दरम्यान विविध क्षेत्रात काम करणार्‍या नागरिकांचा सत्कार करण्यात आला.