नाशिक: लायन्स क्लब डिस्ट्रिक्ट 3234 डी दोन म्हणजेच नाशिक, अहमदनगर, पुणे जिल्हा आणि पिंपरी चिंचवड विभाग कार्यक्षेत्रासाठी दरवर्षी प्रांतपाल आणि उपप्रांतपाल यांची निवड केली जाते. यावर्षी देखील ही निवड प्रक्रिया पार पडली असून उपप्रांतपालपदी राजेश कोठवदे यांची निवड करण्यात आली आहे. इ-वोटिंग पद्धतीने ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. यात लायन्स क्लब ऑफ नाशिक रॉयल्सचे राजेश कोठावदे यांची निवड झाली. द्वितीय क्रमांकाचे मते त्यांना मिळाली. एकूण मतांपैकी 70 टक्के मते त्यांना मिळाल्याने त्यांच्या कार्याची ही पोचपावती मानली जात आहे. लायन्स क्लब इंटरनॅशनल फाउंडेशनकडून नाशिक रिजनमध्ये गरजू प्रकल्पांसाठी हजारो डॉलर्सची ग्रँड आजपर्यंत आलेली असून यापुढेही नाशिक रिजनसाठी काम करत राहणार असल्याचे राजेश कोठावदे यांनी सांगितले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल आंतरराष्ट्रीय संचालक नवल मालू, झखऊन नरेंद्र भंडारी, प्रांतपाल ओमप्रकाश पेठे, राजू मुछाल, गिरीश मालपाणी, मिलिंद पोकळे, डॉ.विक्रांत जाधव, विनोद कपूर, अभय शास्त्री झ हेमंत नाईक, बापू निकुंभ, शेखर सोनवणे, मनीष अहिरे यांनी अभिनंदन केले आहे.