जळगाव । श हरातील काव्यरत्नावली चौकांत स्व. भवरलाल जैन यांच्या स्मरणार्थ भाऊंचे उद्यान जैन उद्योग समुहाने विकसित केले आहे. याच प्रमाणे शहरातील महानगर पालिकेच्या इतर उद्यानांना विकसित करण्यासाठी विविध संस्थाद्वारे सुरू झाले आहे. यात बहिणाबाई उद्यान हे लायन्स क्लबद्वारे विकसित करण्यात येणार आहे. बहिणाबाई उद्यानाच्या सुशोभिकरणासाठी लायन्य क्लबने पुढाकार घेतला आहे. यासंदर्भांत लायन्स क्लबने महानगर पालिकेशी पत्रव्यवहार करून बहिणाबाई उद्यान विकसीत करण्याची परवानगी मागविण्यात आली होती.
खेळण्यांची दुरूस्ती
बहिणाबाई उद्यानात लहान मुलांसाठी खेळणी लायन्स क्लबद्वारे ठेवण्यात येणार आहे. तसेच उद्यानात तुटलेल्या अवस्थेतील खेळणी क्लबद्वारे दुरूस्त करण्यात येणार आहे. यासोबतच बहिणाबाई यांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. यात बहिणाबाई यांच्या उद्यानात गॅ्रनाईटवर बहिणाबाई यांच्या काव्य पंक्ती कोरण्यात येणार आहे. यासोबतच बंद अवस्थेतील कारंजाची दुरूस्ती करण्यात येणार आहे.
बहिणाबाई उद्यानाचे सुशोभिकरण
बहिणाबाई उद्यानाचा सुशोभिकरणासाठी महापौर नितीन लढ्ढा व लायन्स क्लबचे सदस्यांनी बुधवार 1 मार्च रोजी सकाळी उद्यानाला भेट दिली. याप्रसंगी क्लबचे ÷अध्यक्ष उत्कर्ष मेहता, प्रोजेक्ट चेअरमन पुनमचंद अग्रवाल, सुगंधी मुणोत, जितेंद्र पारख, अनिल पगारिया व शहरत अभियंता सुनील भोळे, डी. एस. थोरात, इंजी. संजय पाटील आदी अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, क्लबतर्फे गुरूवारी दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे.
लोकसहभागातून उद्यानाचा विकास
शहरातील उद्यानाचे दुरावस्था झालेली दिसून येत आहे. यात गांधी उद्यान, श्यामाप्रसाद मुखर्जी उद्याना येथील खेळणी तुटलेली आहेत. महानगर पालिकेने लोकसहभागातून शहरा सुशोभिकरणाचे धोरण आखले आहे. याला सहकार्य म्हणून बहिणाबाई उद्यानातील तुटलेले ओटे, नादुरूस्त खेळणी यांना दुरूस्त करण्याचा मानस यावेळी लायन्य क्लबचे अध्यक्ष उत्कर्ष मेहता यांनी व्यक्त केला.