लायन्स पॉईटच्या दरीत पडून युवकाचा मृत्यु

0

लोणावळा : मित्रांच्या सोबत फिरायला आलेल्या एका युवकाचा रविवारी मध्यरात्री लायन्स पॉईटच्या दरीत पडून मृत्यु झाला. नचिकेत पवार ( वय 24, रा. कोळसा, ता. शिंदगाव, जिल्हा हिंगोली) असे या मयत झालेल्या युवकाचे नाव आहे. हिंगोलीवरुन नचिकेत व त्याचे मित्र रविवारी उशिरा लोणावळ्यातील लायन्स पॉईट येथे चारचाकी गाडीतून फिरायला आले होते. यावेळी नचिकेत हा दरीला लावण्यात आलेल्या सुरक्षा रेलिंगच्या पुढे जाऊन धोकादायकरित्या बसला होता. पाय घसरल्याने दरीत पडून त्याचा मृत्यु झाला.

सोमवारी दुपारी या घटनेची माहिती समजल्यानंतर लोणावळा ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक बालाजी गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल शरद जाधवर, पोलीस हवालदार गुलाब नाणेकर यांच्यासह शिवदुर्ग मित्र या रेस्कू पथकाचे कार्यकर्ते सुनिल गायकवाड व अन्य यांनी घटनास्थळी जाऊन शोधकार्य सुरु केले.