लालगोट्यातून बंदुकीसह घातक शस्त्र जप्त ; एकाला अटक

0

मुक्ताईनगर- तालुक्यातील लालगोटा गावातील संशयीत विजयसिंग युवराज भोसले (35) याच्या घरातून पोलिसांनी बंदुकीसह तलवार व लोखंडी भाला जप्त करण्यात आला. 24 रोजी दुपारी ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी सुधाकर शेजाळे यांच्या फिर्यादीनुसार संशयीत आरोपी भोसले विरुद्ध मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येवून त्यास अटक करण्यात आली. आरोपीस न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.