लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी गेलेल्या भक्ताचे १३५ मोबाईल लंपास

0

मुंबई :लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी लालबाग-परळमध्ये गणेशभक्तांची अलोट गर्दी उसळली आहे. त्यामुळे काही चोरट्यांनी या गर्दीचा गैरफायदा घेतला असून गणेशभक्तांचे १३५ मोबाईल लंपास केले आहेत. त्याच्या तक्रारीही पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आल्या असून एवढ्या प्रचंड गर्दीत या चोरांना पकडणं पोलिसांसाठी आव्हान ठरत आहे.

दरवर्षी प्रमाणे यंदाही लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक मुंबई-ठाण्याच्या कानाकोपऱ्यातून लालबागला दाखल झाले आहेत. त्यामुळे हा परिसर गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासूनच गर्दीने फुलून गेला आहे. दिवस-रात्र प्रचंड गर्दी होत असल्याने त्याचा फायदा घेत काही चोरट्यांनी हात की सफाई करण्यास सुरुवात केली असून त्याचा फटका गणेशभक्तांना बसला आहे. लालबाग-परळ परिसरात गेल्या चार दिवसांत चोरट्यांनी १३५ मोबाईल लंपास केल्याची काळाचौकी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.