लालमातीच्या ईसमाची विषारी द्रव सेवन करून आत्महत्या

0

रावेर- तालुक्यातील लालमाती येथील कुर्बान हबीब तडवी (32, लालमाती) या ईसमाने काहीतरी विषारी द्रव पदार्थ सेवन केल्याने त्याच्यावर रावेर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना शनिवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. तडवी यांनी शुक्रवारी विष प्राशन केल्यानंतर त्यांना रावेर ग्रामीण रुग्णालयात 2 रोजी रात्री 11.30 वाजता दाखल करण्यात आले मात्र शनिवारी त्यांचा मृत्यू झाला. याबाबत रावेर पोलिसात ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी.बारेला यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली रामदास हवालदार जितेंद्र जैन करीत आहेत.