लालमातीजवळ ट्रक लुटण्याचा प्रयत्न फसला

0

रावेर । आदिवासी भागातील लालमातीजवळ रात्रीच्या सुमारास सफरचंदने भरलेला ट्रक लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. सुदैवाने ट्रकच्या मागे येणार्‍या दोन मोटारसायकल चालकांच्या सतर्कतेने चोरीची मोठी घटना टळली, मात्र पाल आऊटपोस्ट पोलीस अधिकार्‍यांचे पेट्रोलिंगच्या कर्तव्याकडे दुर्लक्ष झाल्याने चोरटे धुमाकुळ घालत आहे. मध्यप्रदेश खरगोनकडून पालमार्गे रावेरच्या दिशेने बुधवार, 30 रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास सफरचंद भरलेला एक ट्रक लालमाती जवळ येतात काही चोरट्यांनी चालू ट्रकमधून सफरचंदचे बॉक्स खाली फेकले लागलीच त्यामागे मोटरसायकल येत असल्याचे दिसताच चोरट्यांनी पोबारा केला. याबाबत मात्र कोणताही गुन्हा दाखल झाला नाही.

रस्तालुटीवर पाल पोलिसांचे दुर्लक्ष
वारंवार पाल ते कुसुंबाच्या दरम्यान रस्तालुटीचे प्रकार वाढत आहे. याआधी देशी तूप, कीटकनाशकचे औषधे यासह इतर रस्तालुटीचे माहेर म्हणून ओळख होत चालली असून पाल पोलीस वारंवार रस्ता लुटीकडे दुर्लक्ष करीत आहेत. सध्या पाल आऊटपोस्टचा कारभार फौजदार कैलास पाटलांच्या खांद्यावर असून त्यांच्या अक्षम्य दुर्लक्षानेच चोरटे वरडोके काढुन वारंवार रस्तालूट करत आहे. याकडे कर्तव्यदक्ष अधिकारी नरेंद्र पिंगळे यांनी लक्ष देण्याची मागणी जनतेतून होत आहे.

रात्री 10 वाजेच्या सुमारास लालमाती गावाजवळ आलो. आम्हाला दुरवरूनच रस्त्यावर ट्रकमधून काही चोरटे सफरचंदाचे बॉक्स खाली फेकतांना दिसले. आम्ही मोटरसायकल थांबवुन चोरी बद्दल आरोळ्या मारल्या असता चोरट्यांनी आमच्या दिशेने दगडफेक केली. याबाबतची वार्ता लालमाती कुसुंब्यात लागताच तेथील ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत चोरट्यांनी पोबारा केला.
– संतोष राठोड, प्रत्यक्षदर्शी