लालमातीजवळ रावेरच्या ईसमास लुटले ; दोघांविरुद्ध गुन्हा

0

रावेर- तालुक्यातील लालमातीजवळ दोन व्यक्तींनी काठीने मारहाण करीत दहा हजारांच्या रोकडसह मोबाईल लांबवल्याची घटना 24 रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी रावेर पोलिसात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक राजेंद्र रायसिंग यांनी भेट देवून तपासाबाबत सूचना केल्या. रावेर शहरातील शेख शोएब खाटीक हे दुचाकी (एम.एच.19 टी.5058) बोकड विकत घेण्यासाठी रावेर येथून खिरोदा प्र. रावेर मार्गे लालमाती, पालकडे जात असताना लालमाती जवळील बहिरामबुवा मंदिराजवळ दोन अज्ञात व्यक्तींनी त्याला अडवून मारहाण केली. तसेच त्याचे जवळील सहा हजार रुपये किमतीचा मोबाइल व रोख 10 हजार रुपये हिसकावून घेतले. यानंतर दोघांनी शेख शोएबच्या डोक्यात काठी मारून पलायन केले. तपास उपनिरीक्षक अमृत पाटील, हवालदार नरेंद्र बाविस्कर करत आहे.