रावेर। लालमाती शासकीय आश्रम शाळेत शिक्षणाचा बोजवारा उडालेला दिसत आहे. दैनंदीन पटापेक्षा विद्यार्थी बोटावर मोजण्याइतके कमी प्रमाणात उपस्थित असतात. त्यांच्या भविष्यावर, शिक्षणावर येथील मुख्याध्यापक सर्रास दुर्लक्ष होतांना दिसत आहे. आदिवासी विद्यार्थीचा शैक्षणिक दृष्ट्या प्रगती व्हावी यासाठी शासन लाखो रूपये खर्च करुन मदत करते परंतु येथील आश्रमशाळेत भेट दिल्यानंतर विद्यार्थ्यांच्या शिक्षणापेक्षा भविष्याची जास्त चिंता येथे जास्त दिसते. येथील शिक्षक मुलांना शिकवण्यापेक्षा स्वत: गप्पा गोष्टी करून संपूर्ण वेळ घालवतात तर मुख्याध्यापक या ना त्या कारणावरुन सतत बाहेर असतात. त्यामुळे मनमर्जीप्रमाणे येथे संपूर्ण कारभार सुरु असल्याचे दिसत आहे.
झाडाझडती करुनसुध्दा शाळा सुधरेना
मागील वर्षी महाराष्ट्र शासनाची पंचायतराज समिती तालुक्यात आली होती. त्यावेळी त्यांनी आवर्जुन या शाळेला भेट दिली होती. तेव्हा येथे शैक्षणिक, पोषण आहार यांच्यासह इतर अनेक गोष्टींवर तीव्र नाराजी व्यक्त करीत संबंधित मुख्यध्यापकाची चांगली झाडाझडती घेऊन विद्यार्थी, पोषण आणि शिक्षणावर लक्ष देण्याचे स्पष्ट सुचना त्यावेळेस येथील अधिकार्यांना देण्यात आल्या होत्या परंतु आजही परिस्थिती जैसे-थे सारखीच आहे.
पंचायतराज जळगावात
विद्यार्थी, शिक्षण, आहार व्यवस्थित मिळतो की नाही यासह इतर शासनाच्या योजनांची पाहणी करण्यासाठी पुढील महिन्यात पंचायतराज या आमदारांची समिती जळगाव जिल्हा दौर्यावर येत असल्याचे समजते. त्यामुळे मागील दौर्यात भेट दिलेल्या लालमाती आश्रम शाळेला पुन्हा भेट द्यावी व विद्यार्थ्यांचे रहिवास, शैक्षणिक गुण यासह इतर योजनेची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी सर्वसाधरण जनतेतून होत आहे.
शिक्षणाचा बट्याबोळ
प्रकल्प अधिकार्यांचे सुद्धा या शाळांकडे दुर्लक्ष होत असून एक प्रकारे आदिवासींच्या जीवनाशी हेळसांड करण्यात ते सुद्धा जबाबदार आहे. साहेब फक्त ऑफिसला बसून उंटावरुन शेळ्या हाकलतात. इकडे गरीब मुलांच्या शिक्षणाचा बट्याबोळ झालेला आहे. याला मुख्याध्यापकसुद्धा तेवढाच जबाबदार आहे. यामुळे कोणताही वचक येथे राहिलेला असल्याचे दिसून येत नाही त्यामुळे पुन्हा येथील मुलांच्या शिक्षणाचा विषय नसल्याने मनमर्जीप्रमाणे येथे वावर सुरु असल्याचे दिसत आहे.