लालूप्रसाद यांच्या चौकशीचा फास अधिक आवळला

0

नवी दिल्ली : माजी रेल्वेमंत्री आणि राजदचे प्रमुख नेते लालूप्रसाद यादव यांच्या मालमत्तांवर धाडी टाकत गुन्हा दाखल केल्यानंतर काही तासांतच त्यांची मुलगी मिसा भारती आणि जावई शैलेश कुमार यांच्या मालकीच्या तीन ठिकाणांवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापे टाकले. त्यामुळे लालूप्रसाद यांच्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी चौकशीचा फास अधिक आवळला असल्याचे स्पष्ट होत आहे. अंमलबजावणी संचालनालयाने राज्यसभा सदस्य असलेल्या लालू यांच्या कन्या मिसा भारती त्याचबरोबर त्यांचे पती शैलेश कुमार यांच्या एकंदर तीन मालमत्तांवर शनिवारी सकाळी छापे टाकले. हवालाच्या माध्यमातून सुमारे 8 हजार कोटी रुपये काळ्याचे पांढरे केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.