रांची: लालू प्रसाद यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. सीबीआयच्या वकिलांनी चर्चेसाठी वेळ मागितल्याने ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे ४ जानेवारी सुनावणी होणार आहे.
बहुचर्चित चारा घोटाळ्यात शिक्षा भोगत असलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी जामिनासाठी अर्ज केलेला होता. लालू यादव यांच्या जामीन अर्जावर मागील तारखेला देखील सुनावणी होऊ शकली नाही. लालू यादव यांच्यावतीने कपिल सिब्बल कोर्टात गेले होते.