लालू प्रसाद यादवांची १२८ कोटींची मालमत्ता जप्तीची शक्यता

0

पाटणा – चारा घोटाळा प्रकरणात तुरुंगात शिक्षा भोगत असलेले राजदचे नेते लालू प्रसाद यादव तसेच त्यांचं कुटुंबियांच्या नावे पाटणा आणि दिल्लीतील अलिशान परिसरात असलेली मालमत्ता जप्त होण्याची शक्यता आहे. नवीन बेनाम संपत्तीच्या कायद्याअंतर्गत मालमत्तेसंदर्भात लालूंना आयकर विभागाने नोटीस दिली आहे. लालूंची तब्बल 128 कोटींची मालमत्ता असून ती लवकरच जप्त होण्याची चिन्ह दिसत आहेत.

लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना शेल कंपन्यांच्या मार्फत त्यांच्या नातेवाइकांनी ही मालमत्ता अत्यंत कमी किमतीत खरेदी केली होती. त्यानंतर ही मालमत्ता लालू प्रसाद यादव यांनी त्यांची पत्नी राबडी देवी आणि मुलांच्या नावावर करून घेतली होती. आयकर विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, लालूच्या या मालमत्तेची एकूम किंमत ही तब्बल 127.75 कोटी आहे. या मालमत्तेत पाटण्यात तयार होत असलेला एक मॉल, दिल्लीतील आलिशान बंगला आणि दिल्ली एअरपोर्ट जवळचे एक शेत इतक्या गोष्टींचा समावेश आहे.