रांची – राजद नेते लालू प्रसाद यादव यांनी जामिनाची मुदत वाढविण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. उपचारासाठी पुरेशा कालावधी गरजेचा आहे. त्यामुळे अंतरिम जामिनाची मुदत सहा आठवडे वाढून द्यावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. रांची न्यायालयात याचिकेवर आज सुनावणी होत आहे.
सध्या लालू प्रसाद यादव चारा घोटाळ्यात शिक्षा भोगत आहेत. लालू प्रसाद यादव यांनी याचिकेत आपण गंभीर आजारी असून मधुमेह, किडनीसह अन्य विकारांनी ग्रस्त असल्याचे म्हटले आहे. लालू प्रसाद यादव यांच्यावर सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यासाठी सहा आठवड्यांनी जामिनाची मुदत वाढवून द्यावी, असे याचिकेत म्हटले आहे. मुलाच्या विवाहासाठी लालू यांना पॅरोल मंजूर करण्यात आला होता. यादरम्यान, उच्च न्यायालयाने उपचारासाठी जामीन मंजूर केला. त्यादिवसापासून लालू प्रसाद तुरूंगाबाहेर आहेत.