रांची – रांची उच्च न्यायालयाने बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने त्यांच्या जामीनात आणखी सहा आठवड्यांनी वाढ केली आहे. डॉक्टरांनी लालूंना तीन महिने आराम करण्याचा सल्ला दिला आहे. आम्हाला यापूर्वीच एका आठवड्याचा जामीन मिळाला होता. आता न्यायालयाने यात सहा महिन्यांनी वाढ केली आहे.
राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू यादव, याच महिन्याच्या सुरुवातीला हृदयाशी संबंधीत उपचासासाठी मुंबईहून पाटण्याला आले होते. लालुंवर चार प्रकरणात कोट्यवधींचा भष्टाचार केल्याचा आरोप असून ते सध्या शिक्षा भेगत आहेत.