लालू प्रसाद यादव यांना डिप्रेशन?

0

रांची : चारा घोटाळा प्रकरणात शिक्षा भोगत असलेले राजदचे नेते लालू प्रसाद यादव डिप्रेशनमध्ये (नैराश्यात) गेले आहेत. रांची येथील राजेंद्र इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्स  (RIMS) ने जारी केलेल्या मेडिकल बुलेटीनमध्ये याचा उल्लेख करण्यात आला आहे. रिम्सचे डॉ. आर. के. श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार,अनेकदा आजारपण व वातावरणातील बदलांमुळे नैराश्य येऊ शकतं. डॉ. आर. के. श्रीवास्तव यांनी याआधीही लालू प्रसाद यादव नैराश्यात असल्याची माहिती दिली होती. त्यावेळी त्यांच्या शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता होती. पायावर सूज असल्याने चालताना त्यांना त्रास होत आहे. त्यातच डिप्रेशनची समस्याही पुढे आली आहे. उच्च रक्तदाबही आहे. मात्र, त्यांना अन्य रुग्णालयात हलविण्याची गरज नसल्याचं श्रीवास्तव यांनी म्हटलं होतं.