लालू म्हणतात नितीशकुमार हा तर पलटूराम आणि साप

0

पाटणा – बिहारमधील सत्ता गेल्यानंतर राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालुप्रसाद यादव यांची आग आग झाली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांना सापाची उपमा देऊन त्यांनी हा साप दर दोन वर्षांनी कात टाकतो आणि नवी त्वचा धारण करतो, अशी टीका लालूप्रसाद यांनी केली आहे. या पलटूराम मोदींना आणि संघपरिवाराला शरण गेला आहे, असेही लालू म्हणाले आहेत. काही दिवसांपूर्वीच लालु यांनी नितीश कुमार यांच्याववर वाकताडन केले. त्याना पलटूराम म्हणत हा राम मोदीनामाचा जप करीत असल्याचे ते म्हणाले. तेजस्वीचे काम पाहून पलटूराम घाबरला आणि भाजपाच्या वळचणीला गेला.

लालुप्रसाद यांनी शरद यादव यांची मात्र स्तुती केली आहे. आपल्या विचारांचे ते पक्के आहेत असे लालुप्रसाद म्हणाले. पलटुराम उर्फ नितीशकुमार विरोधकांच्या एकतेबद्दल बोलायचे पण ते उलटले आणि आरएसएसच्या साथीला गेले. मोदींच्या मांडीवर बसून हा पलटू नमो शरणं गच्छामीचा जप करीत आहे.

माझ्यावरील कारवाई बोगसकागदपत्रे बनवून….
लालुप्रसाद म्हणाले की खोटी कागदपत्रे तयार करून मोदी सरकार माझ्यावर छापे टाकीत आहे. मोठमोठे कंपनीमालक, श्रीमंतांवर मोदी का छापे टाकीत नाहीत. ही परीस्थिती आणीबाणीसारखी आहे. आमच्यावर छापा आणि अदानींना सवलती. त्यांच्याकडे यांना बेहिशेबी पैसा, मालमत्ता सापडत नाही. पनामात नावे आली त्यांच्यावर काय कारवाई केलीत, ते सांगा असेही लालू म्हणाले.

नितीश कुमार मुख्यमंत्री पदासाठी रडले होते…..
नितीश कुमार यांना मी छोटा भाऊ मानले. जीतनराम मांझींनी याला तडाखा दिल्यावर तो रडायचा. मुलायमसिंह यादव यांच्याजवळ हा रडत गेला. मला मुख्यमंत्री करा असा आग्रह धरला. आज आरजेडी त्याला अयोग्य दिसी लागले. लोकांनाच सत्य माहीत, असे लालू म्हणाले.