लाल किल्ला परिसरातून दोन दहशतवाद्यांना अटक

0

नवी दिल्ली-दिल्लीतील लाल किल्ला परिसरात दोन दहशतवाद्यांना पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने ही कारवाई केली असून सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या परिसरात दहशतवाद्यांना अटक झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यांच्याकडून २ पिस्तूल, काडतुसे आणि ४ मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहे.