तुमच्या मोबाईलमधील बॅटरीचं चार्जिंग संपलंय, सोलर पॉवरचा पर्यायही उरला नाही आणि तुम्ही एकदम हेल्पलेस झाला आहात… अशा स्थितीतही आता घाबरू नका. अमेरिकेतील बिंघामटन विद्यापीठातील संशोधकांनी तुमच्या थुंकितील लाळेपासून चार्ज होणारी अनोखी बॅटरी तयार केली आहे. वैज्ञानिकांनी कागदावर आधारित मायक्रोबिअल फ्युअल सेल्स (एमएफसीज) बॅटरी शोधून काढली आहे. तिचे चार्जिंग लाळेतील बॅक्टेरियापासून होणार आहे. अतिशय कठिण प्रसंगी बॅटरी संपली तर लाळेच्या मदतीने बॅटरी पुन्हा काम करणार आहे.
निरूपयोगी कोरड्या इलेक्ट्रीक सेलपासून जीवाणू (बॅक्टेरिया) इंधनाचा वापर करीत ही बॅटरी तयार करण्यात आली आहे. त्यात डायोडचाही समावेश आहे. सेलमध्ये लाळ मिसळली की त्यातुन विद्युतशक्ती निर्णाण होईल. ही उर्जा सेलमध्ये साठून राहील अशीही व्यवस्था आहे.
पारंपरिक विद्युत बॅटऱ्यांपेक्षा चार्जिंगसाठी हा मार्ग अनोखा असल्याने तो लोकप्रिय होईल, अशी खात्री वैज्ञानिकांना वाटते.