लासलगाव ‘कांदा हब’ होणार; खोतांची घोषणा

0

नाशिक । निफाड तालुक्यातील विंचूर येथील कृषी उत्पन्न उपबाजार समितीमध्ये नुकतीच कांदा लिलावास खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. लासलगाव संपुर्ण देशाला कांदा पुरवितो. यामुळे कांदा हबसाठी राज्य शासन केंद्राचे कृषी मंत्रालय व रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करित आहे.या कांदा हबचा शेतकर्‍यांना मोठा फायदा होणार होईल.असे कृषीमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले. कांद्याचा भाव चढ – उतार सुरू असतो. यामुळे शेतकर्‍यांना चांगला भाव मिळावा म्हणुन कांदा साठवणुकीची योग्य व्यवस्था होण्यासाठी शासन उपाययोजना करीत आहे.सध्या कांद्याला चांगला भाव असून तो तसाच मिळावा यासाठी केंद्र सरकारने सद्याचे आयात-निर्यात धोरण बदलू नये व कांदा साठवणुकीवर बंदी आणू नये असे सुचविण्यात आले असल्याचेही खोत यांनी नमूद केले.

32 कोटीचे अनुदान मिळणार
येथील कांदा संपुर्ण देशात जातो. जिल्ह्यातील कांदा उत्पादकांच्या सोयीसाठी लासलगाव येथे कांदा ‘हब’ उभारण्यात येईल, अशी घोषणा कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे. सोयाबीनवर आयात कर वाढविण्यात आला असून हमी भावाने 75 लाख टन तूर खरेदी करण्यात आली आहे. त्यासाठी बाहेरून आयात होणार्‍या उडीदवरील आयात कमाल मर्यादा तीन लाख टनांवर आणण्यात आली. तूर डाळीवर दोन लाख टन आयातीचे बंधन घातले गेल्यामुळे सोयाबीनचा भाव सहा हजार रुपये प्रतिक्विंटल, उडीद 6400 प्र तिक्विंटल झाले आहेत. शेतकर्‍यांना अडचणींमधून बाहेर काढण्यासाठी या वर्षी नाशिक जिल्ह्यात 15 कोटी 28 लाख अनुदान व मागील प्रलंबित अनुदान देण्यासाठी 32 कोटी रुपये देण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.राज्याच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी शेतकर्‍यांच्या मालाला योग्य दर देण्यासाठी राज्याने कृषी मूल्य आयोगाची स्थापना केली असून जुलैपासून आयोगाने काम सुरू केले असल्याची माहिती दिली. नाशवंत मालाला हमी भाव देण्यासाठी पणन विभागाच्या अंतर्गत समिती स्थापन करण्यात येत आहे.