कर्जबाजारीपणातून झाडाला गळफास घेऊन संपविले जीवन
चोपडा । कर्जबाजारीपणाला कंटाळून एका तीस वर्षीय शेतकर्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना तालुक्यातील लासूर येथे घडली. वासुदेव मार्तंड माळी (महाजन) (30) असे त्यांचे नाव असून सततची नापिकी, उन्हाळी कांद्याला भाव न मिळणे व कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी जीवन संपविल्याचे समजते.
नव्या कर्जाची शास्वती मिळाली नाही
15 मे रोजी वासुदेव माळी हे सकाळी शेतात सरपण आणायचे सांगून घरून निघाले. 9 वाजेच्या सुमारास त्यांनी शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. त्यांचा मृतदेह चोपडा उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. शेतकरी वासुदेव माळी यांनी आपल्या शेतात उन्हाळी कांदा लागवड केलेली होती. त्या कांदा पिकासाठी रासायनिक खते ,बी, रोप ,रासायनिक औषधी फवारणी व महागडी मजुरी असा भरमसाठ खर्च झाला मात्र त्यास भाव मिळाला नाही. त्यामुळे हात उसनवारीचे त्यांचेवर दी ते 2 लाख रुपये ककर्ज होते. यासह विकास सोसायटीचे कर्ज होते ते शासनाने माफ केले मात्र नवीन कर्ज केव्हा उपलब्ध होईल, याची शाश्वती कोणत्याही बँकने दिली नाही म्हणून त्यांनी गळफास घेऊन आत्महत्येचा मार्ग पत्करला असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.