लासूर विद्यालयात शंभर डझन वह्या वाटपाचा कार्यक्रम

0

शिरपूर । गेल्या वर्षी शिरपूर तालुक्यातील तर्‍हाडी येथील सोमा पाटील विद्यालयात गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना अडीचशे डझन वह्या वाटपाचा कार्यक्रम मुंबईतील प्रेम स्पर्श या ट्रस्टने केला होता. त्याच बरोबर शिरपूरच्या जैन समाजाच्या वतीने गरजवंत मुलांना शालेय ड्रेस वाटप करण्यात आले होते. तसाच यंदा देखील चोपडा तालुक्यातील लासूर येथील महात्मा गांधी महाविद्यालया 1जुलै रोजी गरजू व हुशार विद्यार्थ्यांना प्रेम स्पर्श च्या वतीने शंभर डझन वह्यांचे वाटप करण्यात आले. शिरपूर चे दानशूर रमेशचंद बागरेचा , गणेश कोचर , रोशन ओसवाल , आतिष ओसवाल आदींनी वह्या वाटप केल्या.

यांची होती उपस्थिती
प्रमुख पाहुणे म्हणून ललित कोचर , विशाल बागरेचा , गणेश कोचर,रोशन ओसवाल , आतिष ओसवाल , रोनक कोचर आदी उपस्थित होते. तर हेमंत भाई कोटँक , केतनभाई शहा , गणेश कोचर आणि प्रेम स्पर्श , वर्धमान संस्कार धामाचे आदी पदधिकार्‍यांचे लासूर विद्यालयातील अध्यक्ष पी.आर. महाजन , चंद्रकांत पाटील , प्रकाश कोठारी , प्राचार्या व्ही.व्ही पाटील , व सुत्रसंचालन पी.ए.वराडे , व्हि.डी.वराडे , रघुनाथ मगरे , अजय पालीवाल , शांतीलाल कोठारी , उपसरपंच गंभीर सर , एम.आर.पाटील , विलास सर आदींनी उपस्थित होते.

मी बर्‍याचदा या संस्थेचे नाव अनेक वृत्तपत्रातून बातमी वाचले आहे. एके दिवशी सहज कोचर यांना भेटलो आणि आमचा परिसर ही गरिब आहे. तुमच्या वतीने शाळेला काहीही दान देता येत असेल तस कळवा मला गरिब घराण्यातील मुलामुलींना शालेय साहित्य करण्याची आयपत नसल्याने असे मुलमुली शिक्षणापासून वंचित राहतात म्हणून वारंवार कोचर यांना सांगत राहायायचो. यागोष्टीची दखल कोचर यांनी घेतली आणि त्यांच्या वरिष्ठांमार्फत शंभर डझन वह्या आज शाळेला मिळाल्या त्या गरिब मुलामुलींना मिळाल्यामुळे त्याच्या उपक्रमाचे शालेय समितीला कौतुक होत आहे.
– रमेशचंद बागरेचा (लासूर) , व्यापारी, शिरपूर