जळगाव। शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ ला.ना. सार्वजनिक विद्यालयात सोमवार दि. 24 रोजी सकाळी 8.30 वाजता वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ प्रमुख अतिथी जळगाव पिपल्स बँकेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील तसेच अॅड. सुशील अत्रे, कार्याध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळ व पदाधिकारी यांचे हस्ते मार्च 2017 शालांत परीक्षेत शि.प्र. मंडळ संचलित शाळांमधून प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना सुवर्णपदक वितरण व शालांत परीक्षेत शे. 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवणार्या गुणवंत विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थी व त्यांचे मातापिता यांचा सत्कार केला जाणार आहे.
याप्रसंगी मंडळाचे पदाधिकारी, देणगीदार शाळेचे माजी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित राहणार असून उपस्थितीचे आवाहन मुख्याध्यापक दुर्गादास मोरे यांनी केले आहे.