ला लीगामध्ये रेआल माद्रिदचा झाला धक्कादायक पराभव

0

माद्रिद । स्टार खेळाडू ख्रिस्तीयानो रोनाल्डोला पुनरागमनानंतरच्या सामन्यात करिष्मा दाखवता न आल्यामुळे ला लीगा फुटबॉल स्पर्धेत रेआल माद्रिदला रेआल बेतिस संघाकडून 0-1 असा धक्कादायक पराभव पत्करावा लागला. माद्रिदचा माजी गोलकिपर अ‍ॅन्टोनियो एडनचा जबरदस्त बचाव आीण स्टॉपेज टाईममध्ये अ‍ॅन्टोनिया सनाब्रियाने केलेल्या गोलाच्या जोरावर रेआल बेतिसने ला लीगा विजेते असलेल्या सघाला आर्श्‍चयाचा धक्का दिला.निर्धारित वेळेच्या शेवटच्या मिनिटांमध्ये सनब्रियाचा शॉट अ‍ॅाफसाईड झाला पण परत 94 व्या मिनिटाला त्याने निर्णायक गोल नोंदवला. या पराभवामुळे रेआल माद्रिदला घरगुती ला लीगामधील सामन्यांमध्ये आता एकही विजय मिळवता आलेला असून गुणतालिकेत हा संघ सातव्या स्थानावर आहे.

आघाडीवर असलेल्या बार्सिलोनाच्या तुलनेत सात गुणांनी पिछाडीवर आहे, अन्य लढतीत अ‍ॅटलेटिको माद्रिद संघाने अ‍ॅटलेटिको बिलबाओचा 2-1 असा पराभव करत आपली अपराजीत आगेकूच कायम राखत तिसर्‍या स्थानावर झेप घेतली. सेव्हिलाने आपल्या घरच्या चाहत्यांसमोर खेळताना लास पल्मासचा 1-0 असा पराभव केला. अन्य संघाप्रमाणे विजेत्या रेआल माद्रिदला यावेळी म्हणावी तशी सुरुवात करता आलेली नाही. मागील हंगामात ब्राझीलच्या सांतोस संघाच्या सलग 73 सामने जिंकण्याच्या 54 वर्षे जुन्या विक्रमाशी बरोबरी करणार्‍या झिनेदीन झिदानला माद्रिद संघाला यावेळी तो जोश दाखवता आलेला नाही. पाच सामन्यांच्या निलंबनानंतर मैदानात परतलेल्या रोनाल्डोने सामन्यात गोल करण्याचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले. सामन्याला पुन्हा सुरुवात होण्याआधी माद्रिदाच्या माजी गोलकिपरने टोनी क्रूस आणि गॅरेथ बेलचे प्रयत्न फोल ठरवले होते.