लिओनेल मेस्सीने गोल केला, रेफ्रींनी नाही पाहिला

0

मेस्ताला । बहुतांशी सर्व खेळांत अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर होत असताना फुटबॉलमध्ये गोललाईन तंत्रज्ञान वापरण्यासाठी आग्रह धरला जात आहे. परंतु, अजूनही वास्तव दूर आहे आणि त्याचा फटका लिओनेल मेस्सी, तसेच त्याच्या बार्सिलोना क्लबला बसला. त्याने मारलेला गोल अर्धा फूट गोलजाळ्यात जाऊनही रेफ्रींनी तो नाकारला आणि स्पॅनिश स्पर्धेत बार्सिलोनाला वेलेन्सियाविरुद्ध 1-1 अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले.स्पॅनिश फुटबॉल स्पर्धेत बार्सिलोना व वेलेन्सिया यांच्यात जोरदार चुरस सुरू आहे. बार्सिलोना गुणतक्त्यात आघाडी असली तरी रविवारचा सामना त्यांनी जिंकला असता, तर आघाडी अधिक भक्कम करण्याची त्यांना संधी होती.

या सामन्यात मेस्सीने 30 व्या मिनिटाला गोल केला. गोलजाळ्यात चेंडू अर्धा फूट आत गेलेला असताना वेलेन्सियाचा गोलरक्षक नेटोने हाताने चेंडू बाहेर फेकला. गोल झाल्याचे बार्सिलोना खेळाडूंना समजताच मेस्सीसह सर्वांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली. परंतु, रेफ्री इग्नासिओ लेग्लेसियास यांच्या मनात काही वेगळे होते. गोल नाकारताना त्यांनी खेळ पुढे सुरू ठेवला. मध्यंतराच्या या वादग्रस्त घटनेनंतर रॉड्रिगोने 60 व्या मिनिटाला वेलेन्सियाला आघाडीवर नेले. परंतु, काही वेळातच जॉर्डी अल्बाने बार्सिलोनाला बरोबरी साधून दिली.