हडपसर । जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेमध्ये लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूलने दमदार कामगिरी केली. जीत कुन डो असोसिएशन आयोजित या स्पर्धेसाठी दौंड, हडपसर, कात्रज, मुंढवा, सासवड, खराडी या परिसरातून जवळपास साडेतीनशे खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला. यानिमित्ताने पंच स्पर्धाही घेण्यात आली यामध्ये शिवराज राजामाने, शाहरुख अन्सारी, गणेश धंडबे, सृष्टी गायकवाड उत्तीर्ण झाले.
यावेळी संजय हरपळे, सुधाताई हरपळे, पोलिस उपनिरीक्षक अजित लकडे, प्राचार्य सुरेखा जगताप, उपप्राचार्य सोनल वेद, संस्थापक अध्यक्ष प्रदीप फासगे, ओंकार लेव्हे, व शाहानूर पटेल उपस्थितीत होते. स्पर्धेचे आयोजन शाहानूर पटेल, सूरज पवार, राजू दिपकर यांनी केले. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल मुख्याध्यापकांनी त्यांचे अभिनंदन केले.