नवी सांगवी (प्रतिनिधी) – येथील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश/मराठी मिडियम स्कूल आणि भारतीय विद्यानिकेतन प्रशालेत प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ज्येष्ठ नागरीक संघाच्या सदस्यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. यावेळी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतूल शितोळे, ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष ईश्वर चौधरी, संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, उपाध्यक्ष प्रणव राव, मुख्याध्यापिका गीता येरुणकर, हर्षा बाठिया, तेजल कोळसे-पाटील, ज्येष्ठ नागरीक संघाचे उपाध्यक्ष अशोक चव्हाण, सुदामराव बोंबले, चंद्रकांत चोपडे, संभाजी मनोकर, गोपीनाथ लोंढे यांच्यासह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी काढत जुनी सांगवी परिसर घोषणांनी दणाणून सोडला. ‘पृथ्वी वाचवा’, पर्यावरण वाचवा’, मुलगी वाचवा’, ‘स्वच्छता राखा’, ‘जय जवान, जय किसान,’ ‘प्लास्टिकचा वापर टाळा’, अशी घोषवाक्ये लिहिलेले फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. विद्यार्थ्यांनी केलेले वेव्ह डान्स लक्षवेधक ठरले. तसेच पिरॅमिड प्रात्यक्षिके सादर करीत विद्यार्थ्यांनी आपल्यातील कलागुण, धाडसाचा उपस्थितांना प्रत्यय दिला. कार्यक्रमात श्रेयस गार्डी, आदित्य पवार, आदित्य लोहार, गौरव माळी, श्रुष्टी मेनन या विद्यार्थ्यांचीही भाषणे झाली.