भुसावळ : शहरातील लिम्पस क्लब परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने प्रज्ञा-शिल महिला मंडळाची स्थापना करण्यात आली. मंडळाच्या फलकाचे अनावरण एपीआय सारिका खैरनार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी नगरसेविका हिना शेख, अरुणा सुरवाडे, साधना भालेराव, सविता मकासरे, पीएसआय नेत्राणे, एएसआय फारुक यांची उपस्थिती होती. महिलांसाठी गृहउद्योग स्थापन करुन शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देणे, अंगणवाडी, बालवाडी चालविणे, क्रीडा स्पर्धा घेणे, कलागुणांना वाव देण्यासाठी कलावंतांना प्रोत्साहन देणे, भारतीय संस्कृतीची जोपासना करण्यासाठी सांस्कृतिक सभागृहाची उभारणी करणे, अंध-अपंग व गोरगरिबांना औषधोपचारासाठी मदत करणे असे विविध उपक्रम या मंडळाच्या माध्यमातून राबविले जाणार आहे.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी मंडळाच्या सदस्या सविता गावंडे, मनिषा जाधव, लता भोजने, वर्षा तपासे, ज्योती मेघे, सारिका जांभुरकर, ललिता सपकाळे, अलका सुरवाडे, सुशिला मोरे, प्रतिभा सोनवणे, प्रभावती सपकाळे, उषा दरोडे, शारदा निळे, रत्ना सोनवणे यांची उपस्थिती होती. सुत्रसंचालन बौध्द महासभेचे शहराध्यक्ष राजेश आव्हाड यांनी केले तर यशस्वीतेसाठी युवा स्टार फाऊंडेशनचे सहकार्य लाभले.