भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बंगळुरू येथे सुरू झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लियॉनच्या जबरदस्त फिरकी माऱ्यापुढे भारतीय फलंदाजांनी ‘ये रे माझ्या मागल्या’ ची पुनरावृत्ती करत पुन्हा एकदा फिरकी गोलंदाजीसमोर लोटांगण घातले. सलामीवीर लोकेश राहुलचा अपवाद वगळता एकही भारतीय फलंदाज खेळपट्टीवर टिकाव धरु शकला नाही. त्यामुळे भारताला २०० धावांचा टप्पा गाठता आलेला नाही. नॅथन लियॉनने या सामन्यात तब्बल आठ बळी घेत भारतीय संघाला सावरायला संधीच दिली नाही. लियॉनच्या फिरकीसमोर सपशेल गुडघे टेकल्याने भारताचा पहिला डाव अवघ्या 189 धावात आटोपला. लियॉनने भारताच्या तब्बल आठ फलंदाजांना तंबूची वाट दाखवली. अपवाद फक्त लोकेश राहुलचा त्याने एकबाजू लावून धरताना (90) धावा केल्या. अन्य फलंदाज फक्त हजेरी लावण्यापुरते मैदानात आले. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने सावधपणे सुरुवात करत — गडी बाद — धावा केल्या असून उद्या, रविवारी धावांचा डोंगर उभारण्याची शक्यता आहे.
आता भारतीय गोलंदाजांची कसोटी लागणार
पुणे येथील पहिल्या कसोटीतील दारुण पराभवानंतर दुसर्या लढतीत टीम इंडियाची बरोबरी साधण्यासाठी ‘कसोटी’ लागणार आहे. 333 धावांनी टीम इंडियाचा धुव्वा उडवून ऑस्ट्रेलियाने चार लढतींच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. बंगळूर येथील कसोटीही कांगारूंनी जिंकल्यास मालिकेत ‘सुरक्षित’ आघाडी होईल. मात्र पहिला डाव दोनशेच्या आत गुंडाळला गेल्याने आता भारतीय गोलंदाजांची कसोटी लागणार आहे. टीम इंडियाची सलग 19 कसोटीत अपराजित राहण्याची मालिकाही खंडित करण्यास स्मिथ अॅण्ड कंपनीला यश आले. पहिल्या चेंडूपासून फिरकीला साथ देणार्या खेळपट्टीवर यजमानांचे हुकमी एक्के आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा फ्लॉप ठरले होते. मात्र भारतात पहिल्यांदाच कसोटी खेळणार्या ऑस्ट्रेलियाच्या स्टीफन ओकिफने 12 विकेट घेत टीम इंडियाच्या फलंदाजीचे ‘बारा’ वाजवले होते. या सामन्यात लायनने टीम इंडियाचे कंबरडे मोडल्याने पहिल्याच कसोटीतील कित्ता संघाने रंगविला आहे.
करुण नायर, अभिनव मुकुंद फेल
विराट कोहलीने गेल्या 24 कसोटीत दरवेळी संघात एक तरी बदल केला आहे. बंगळूर कसोटीत दोन महत्वाचे बदल केले. मुरली विजयच्या जागी त्रिशतकवीर करूण नायरला तर जयंत यादवच्या जागी अभिनव मुकुंदला संधी दिली. धोनीकडून नेतृत्वाचा वारसा स्वीकारणा-या कोहलीने ज्या २४ सामन्यात नेतृत्व केले त्यापैकी अनेक सामन्यात वेगवेगळे संयोजन पहायला मिळाले. या सामन्यातही एक-दोन बदल अपेक्षित होते. कोहली सातत्याने पाच गोलंदाजांना खेळविण्यावर भर देत आहे. त्याचे हे डावपेच गेल्या पाच महिन्यात यशस्वी देखील ठरले आहेत. मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्ध अद्याप ते प्रभावी ठरलेले नाही. तिहेरी शतकवीर करुण नायरला अतिरिक्त फलंदाज संधी मिळाली मात्र त्याला सोने करता आले नाही. तर अभिनव देखील शून्यावर बाद झाला. अश्विन, जडेजा आणि उमेश यादव यांना संघात ठेवत ईशांत किंवा भुवनेश्वर यांच्यापैकी इशांतला पसंती दिली. पाच गोलंदाजांसह मैदानात उतरण्याची रणनीती कायम ठेवली जाणार असल्याने ऑस्ट्रेलियानेदेखील संघात बदल केला नाही.
‘तू चल मै आया’ ची परिस्थिती
मुरली विजयच्या जागी अभिनव मुकुंदला तर जयंत यादवला वगळून करुण नायरला संधी देण्यात आली आहे. मात्र के राहुलसोबत ओपनिंला उतरलेला अभिनव मुकुंद एकही धाव न करता बाद झाला. पहिला धक्का बसल्यानंतर लोकेश राहुलने चेतेश्वर पुजाराच्या साथीने अर्धशतकी भागीदारी रचत भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भारताचा डाव काहीसा स्थिरावला होता, असे वाटत होते. मात्र, उपहारापूर्वी पुजारा आणि उपहारानंतरच्या सत्रात विराट कोहली बाद झाल्याने भारतीय संघाच्या अडचणीत सापडला. त्यानंतर अजिंक्य रहाणे (१७) देखील खेळपट्टीवर फार काळ टिकाव धरू शकला नाही. लियॉनच्या चेंडूचा अंदाज न आल्यामुळे तो यष्टिचित झाला. यानंतर करूण नायरने लोकेश राहुलला साथ देण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्टीव्हन ओ कफीने त्याला २७ धावांवर बाद केले. त्यानंतर मैदानात आलेला आर. अश्विन (७) आणि वृद्धिमान साहा (१) हेदेखील झटपट माघारी परतले. मात्र, ही सगळी पडझड सुरु असताना लोकेश राहुलने एक बाजू समर्थपणे लावून धरली. मात्र शेवटी त्याचाही संयम तुटला आणि तो ९० धावांवर बाद झाला.
कांगारूंचा आत्मविश्वास हीच बळकटी
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) क्रमवारीत असलेले अव्वल स्थान सिद्ध करण्यासाठी कर्णधार कोहली आणि विराट सेनेला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात जोरदार पुनरागमन करण्याची संधी होती. पण, भारतीय फलंदाजांनी ती गमाविली. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चोख अभ्यास करून आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने हे डावपेच भारतीय संघावर उलटवला आहे. पहिल्या विजयानिशी आत्मविश्वास उंचावलेला ऑस्ट्रेलियाचा संघ बंगळूरुत देखील मोठ्या आत्मविश्वासाने खेळत आहे. त्यामुळे आता टीम इंडिया या मालिकेत पुनरागमन करणार का, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. ०-१ असे पिछाडीवर पडलेल्या भारतीय संघाला गार्डन सिटी अर्थात बेंगळूरुत सरशी साधण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. लियॉनच्या फिरकीसमोर सपशेल गुडघे टेकल्याने भारताचा पहिला डाव अवघ्या 189 धावात आटोपला. १८९ धावांना उत्तर देताना ऑस्ट्रेलियाने सावध सुरुवात केली असून —- धावा झाल्या आहेत. पहिल्या डावात मोठी आघाडी घेण्याच्या पवित्र्यात ऑस्ट्रेलियन संघ आहे. भारतीय फिरकीकडून आता मोठ्या अपेक्षा आहेत.