जळगाव। शहरातील मोहाडी रस्त्यावरील लिलावती जैन अपार्टमेंटमध्ये राहणार्या आयडीबीआय बँकेच्या असिस्टंट मॅनेजरच्या घरी अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारत 1 लाख 60 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना मंगळवारी उघकीस आली असून याप्रकरणी आज रामानंदनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहाडी रस्त्यावरील लिलावती जैन अपार्टमेंटमध्ये वैभव कुमार हे पत्नी ईतीशा व मुलासोबत राहतात. तर वैभव हे आदर्श नगरातील आयडीबीआय बँकेत असिस्टंट मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत.
चोरट्यांचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश
वैभव यांच्या पत्नी ईतीशा ह्या गेल्या महिनी 10 एप्रिल रोजी उत्तर प्रदेशातील गाझीयाबाद येथे माहेरी गेल्या होत्या. त्यानंतर वैभव हे देखील कानपुर येथे 5 मे रोजी सालीच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी निघून गेले. त्यामुळे घरात कुणीही नव्हेत. बंद घर असल्याचे पाहून चोरट्यांनी घराचा कडी कायंडा ताडून घरात प्रवेश करत कपाटातील सोने-चांदीचे दागिने चोरून नेले. मंगळवारी 9 रोजी सकाळी 11 वाजता वैभव यांचे मित्र तपस कुमार व गोविंद बारी यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी वैभव यांना फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर वैभव यांनी त्यांचा मित्र राजेंद्र माणिक पाटील याला घरात पाहणी करण्यास पाठवले असता राजेंद्र यांना घराचा कडी-कोयंडा तोडलेला तसेच सामान अस्ताव्यस्त फेकलेले दिसल्यानंतर त्यांनी वैभव यांना संपूर्ण माहिती कळविली. मंगळवारी रात्री 12.30 वाजताच वैभव हे पत्नी व सासु यांच्यासोबत जळगाव गाठले. घरात आल्यानंतर त्यांना कडी-कोयंडा तोडलेला दिसला. घरात प्रवेश केल्यानंतर आतील खोलीतील कपाटा वाकलेले दिसून ते तोडलेले होते. त्यातुन एकूण 1 लाख 60 हजार रुपयांचा सोने-चांदीचे दागिने चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. बुधवारी सकाळीच रामानंदनगर पोलिस ठाणे गाठत त्यांनी अज्ञात चोरट्यांविरूध्द तक्रार दाखल केली. त्यानुसार चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
असा गेला मुद्देमाल: चोरट्यांनी घरात डल्ला मारल्यानंतर कपाटातील 7 ग्रँम वजनाच्या सोन्याच्या दोन चैन, 10 ग्रँम वजनाच्या सोन्याच्या दोन अंगठ्या, 2 ग्रँम सोन्याच्या पाच अंगठ्या, 2.5 ग्रँम वजनाच्या सोन्याचे तीन पदक, 2 ग्रँम वजनाची सोन्याचे चार कनातील टॉप्स, दोन हजार रुपये किंमतीची चांदीची लक्ष्तीची मृर्ती व शिक्के, पाच हजार रुपये रोख असा एकूण 1 लाख 60 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे.