लिलाव प्रक्रियेकडे पाठ

0

जळगाव– महानगरपालिकेतर्फे मालमत्ता कर वसुलीसाठी मागील वर्षी मोहीम राबविली होती.वारंवार नोटीस देवून देखील थकबाकी न भरल्याने 38 पैकी 23थकबाकीदारांच्या मालमत्तांचा जाहीर लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.त्यासाठी बुधवारी सकाळी 11 वाजता लिलाव प्रक्रियेचे आयोजन करण्यात आले होते.मनपा अधिकार्‍यांनी लिलावाची तयारी करुन ठेवली होती.मात्र या प्रक्रियेत मालमत्ता करण्यासाठी कोणीही उपस्थित राहिले नाहीत.
मालमत्ता कर वसुलीसाठी मनपातर्फे गत वर्षी वसुली मोहीम राबविली होती.मनपाच्या चारही प्रभागातून बड्या थकबाकीदारांची यादी तयार केली गेली होती.जवळपास 400 थकबाकीदारांची यादी चौकाचौकात लावण्यात आली होती.यातील काही थकबाकीदारांनी थकबाकी भरली,तर काही थकबाकीदारांनी अद्यापही मालमत्ता कराची थकबाकी भरली नाही. त्यामुळे थकबाकीदारांच्या मालमत्तांचा जाहीर लिलाव करण्याचा प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार आज मनपाच्या दुसर्‍या मजल्यावर जाहीर लिलावाची प्रक्रिया होणार होती मात्र कोणीही बोली लावण्यासाठी आले नाही.त्यामुळे प्रक्रिया स्थगित करण्यात आली.