जळगाव । जामनेर तालुक्यातील लिहे तांडा येथील 40 वर्षीय व्यक्तीने शेतात फवारणीचे औषध घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, कमलाकर दशरथ चव्हाण (वय-40) रा. लिहे तांडा ता. जामनेर येथील एकाने आपल्या शेतात कपाशी फवारणीचे औषध घेवून आत्महत्येचा प्रयत्न केला. रूग्णालयात तातडीने दाखल केले. आता प्रकृती स्थिर आहे.