पॅरिस । फ्रान्स राष्ट्राध्यक्षांच्या पदासाठी पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. यात रुढीवादी फ्रांस्वा फिलनचा पराभव झाला. तर मध्यमार्गी इमॅन्युएल मॅकरॉन आणि कडव्या उजव्या विचारसरणीच्या मारिन ली पेन दुसर्या फेरीच्या निवडणुकीसाठी दावेदार ठरले आहेत.
रविवारी झालेली पहिल्या टप्प्यातील निवडणूक इमॅन्युएल मॅकरॉन यांनी जिंकली असून ते 7 मे रोजी होणार्या दुसर्या टप्प्यासाठी पात्र ठरले आहेत. मध्यमार्गी मॅकरॉन आणि कडव्या उजव्या विचारसरणीच्या मारिन ली पेन यांच्यात पुढील लढत रंगणार आहे. दरम्यान, फिलन हे राष्ट्रध्यक्ष पदासाठी प्रबळ उमेदवार मानले जात होते. परंतु, त्यांना पराभव झाला. फ्रान्स येथील माध्यमांनुसार, मॅकरॉन यांना 23.7 टक्के मते मिळाली. तर ली पेन यांना 21.7 टक्के मते मिळाली आहेत.