जळगाव । शाळेत शालेय साहित्य विक्री केल्याप्रकरणी माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकार्यांनी शहरातील प. न. लुंकड कन्या शाळेतील तब्बल लाखांचे शैक्षणिक साहित्य प्रयोगशाळेत सील करून ठेवले होते. शाळेच्या खुलाशानंतर शिक्षण विभागाने गुरुवारी सील केलेली प्रयोगशाळा उघडून विद्यार्थ्यांना हे साहित्य मोफत वाटप केले.
प. न. लुंकड कन्या शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य विक्री केले जात असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर शिक्षणाधिकारी डी. पी. महाजन यांनी कन्या शाळेत स्वत: तपासणी करून शैक्षणिक साहित्य असलेली प्रयोगशाळेची खोली सील केली होती. शाळेच्या मुख्याध्यापकांनी शिक्षण विभागाला या संदर्भात लेखी खुलासा सादर केला आहे. मुख्याध्यापकाशिवाय इतर दोन शिक्षकांना या संदर्भात नोटीस बजावण्यात आली आहे. गुरूवारी शिक्षण विभागाने शाळेच्या प्रयोगशाळेला लावलेले सील काढून टाकले. प्रयोगशाळेत असलेले हे शैक्षणिक साहित्य पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत वाटप केले. उर्वरीत दोन शिक्षकांकडून खुलासे मागवले. त्यांच्या खुलाशानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. लाखो रुपयाचे शालेय साहित्य सिलबंद करण्यात आलेले होते.