‘लुका छुपी’ची पहिली झलक!

0

मुंबई : कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनन पहिल्यांदा एकत्र दिसणार आहेत. हे दोघे एक रोमँटिक – कॉमेडी चित्रपट घेऊन येत आहे. ‘लुका छुपी’ असे या चित्रपटाचे नाव आहे. नुकतेच या चित्रपटाची पहिली झलक समोर आली आहे.

‘लुका छुपी’ चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उटेकर करत असून निर्माते विजन आहे. यामध्ये कार्तिक एका स्थानिक न्यूज चॅनेलचा स्टार रेपोर्टरची भूमिका साकारणार आहे. एका छोट्या शहराच्या लव्ह स्टोरीवर आधारित हा चित्रपट असणार आहे. ही नवीन जोडी प्रेक्षकांना कितपत आवडेल, हे चित्रपट रिलीझ झाल्यानंतर समजेल.