लूटप्रकरणी निखील राजपूतसह तिघांना पोलिसांकडून अटक

0

भुसावळ । पोलीस दप्तरी कुविख्यात अशी ख्याती असलेल्या निखील राजपूतसह तिघांच्या मुसक्या बाजारपेठ पोलिसांनी आवळल्या आहेत. तक्रारदाराला मारहाण करीत त्यास लूटल्याप्रकरणी आरोपींवर कारवाई करण्यात आली.

फिर्यादी संजय लक्ष्मण भारंबे (शिव कॉलनी, शिवपूर-कन्हाळा, भुसावळ) हे 15 रोजी सायंकाळी सव्वासात वाजता हॉटेल सुहासजवळून जात असताना आरोपी निखील सुरेश राजपूत, नकुल थानसिंग राजपूत (पाटील), भूषण प्रल्हाद राजपूत, धीरज अर्जुन राणे (सर्व रा.श्रीराम नगर, भुसावळ) यांनी रस्ता अडवत मारहाण केली तसेच निखीलने आपल्या हातातील धारदार शस्त्राने डोळ्यावर मारहाण करून दुखापत केली. या गुन्ह्यातील धीरज राणे वगळता तीनही आरोपींना अटक करण्यात आली. सहा.अधीक्षक नीलोत्पल, निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार युवराज नागरूत, बंटी सैंदाणे, सुनील थोरात, रवींद्र बिर्‍हाडे, ज यराम खोडपे, कृष्णा देशमुख आदींच्या पथकाने आरोपींच्या लागलीच मुसक्या आवळल्या.