मे महिन्यात चुंचाळे ते नायगाव रस्त्यावर घडली होती घटना
यावल- बचत गटाकडील रक्कम वसूल करून जळगाव येथे घेवून जाणार्या भारत फायनन्स इन्कुजन लि.मी.हैद्राबाद शाखेच्या कर्मचार्यास यावल तालुक्यातील चुंचाळे -नायगाव रस्त्यावर 24 मे रोजी दुपारी मारहाण करून एक लाख 38 हजाराची रक्कम लुटून आरोपी पसार झाले होते. या प्रकरणी यावल पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता.
भारत फायनन्स इन्कुजन लि.मी.हैद्राबाद शाखेचे जळगाव येथील कर्मचारी शिवाजी निंबाजी गवळी, रा.दादावाडी जळगाव हे बचत गटाकडील दैनंदिन रक्कम वसूल करून जळगाव येथे दुचाकीने घेवून जात होते मात्र दुपारी दोन वाजेच्या सुमारास यावल तालुक्यातील चुंचाळे-नायगाव रस्त्यावरील डबकी नाल्याजवळ दोन अज्ञातांनी त्यांना मारहाण करून त्यांचे जवळील एक लाख 38 हजार 304 रूपयांची लुटमार केली होती. यामध्ये 11 हजार रुपयांच्या सॅमसंग कंपनीच्या मोबाईलाचा समावेश होता. या प्रकरणी शिवाजी गवळी यांनी यावल पोलिसांत फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल झाला होता. यामुळे यावल पोलिसांनी जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासचक्रे फिरवून सलीम अलाबक्श तडवी (रा.भोकरी, ता.रावेर), राजू बिस्मिला तडवी व अमीन शावखा तडवी (दोघे रा.सावखेडासीम, ता.यावल) अशा तिघांना ताब्यात घेवून सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.