जळगाव । ममुराबाद रस्त्यावरील लेंडी नाल्याचा नैसर्गिक प्रवाह बदलवून त्यावर बांधकाम व्यावसायिक बांधकाम करीत असल्याची तक्रारीची चौकशी सुरु आहे. त्यामुळे गट न. 507 मध्ये श्री श्री इंन्फ्रास्ट्रक्चर ग्रुप अन्ड विजय कुमार जैन व्हेंचर यांना दिलेली बांधकाम परवानगी स्थगित करण्याची मागणी अॅड. विजय पाटील यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे. ममुराबाद रस्त्यावरील लेंडी नाल्याचा नैसर्गिक प्रवाह बदलवून त्यावर बांधकाम व्यावसायिक बांधकाम करीत असल्याची तक्रार विजय पाटी यांनी आयुक्त जीवन सोनवणे यांच्याकडे केली आहे.
तक्रारीचा निर्णय होत नाही तोपर्यंत स्थगिती द्या
ममुराबाद रेल्वे पुलाच्यया पुढील गट न.507 मधील जागेतून हा 50 फुट रुंदीचा नाला ममुराबाद रस्त्याला लागून 100 वर्षापासून वाहत आहे. परंतु गेल्या वर्षी नाल्याचा प्रवाह बंद करुन त्यात मातीचा भराव टाकून श्री श्री इंन्फ्रास्ट्रक्चर ग्रुप अन्ड विजय कुमार जैन व्हेंचर यांनी वळविल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत चौकशी सुरु करण्यात आली आहे. त्यामुले तक्रारीचा निर्णय होत नाही तोपर्यंत बांधकाम परवानगी स्थगिती करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
जळगाव हद्दीतील शिरसोली रस्त्यावरील बांधकामांसाठी नियमानुसार जागा सोडली नसल्याने नोटीस देण्यात आली होती. यावरा राज्यमंत्र्यांकडे सुनावणी झाली होती. यावेळी हा रस्ता अ वर्गीकरण करण्याचा प्रस्ताव पाठविण्याचे आदेश राज्यमंत्र्यांनी दिले होते. मात्र, यापूर्वीच हा रस्ता केंद्र शासनाने राष्ट्रीय राजमार्ग जाहीर केला आहे. त्यामुळे रस्त्यांचे अ वर्गीकरणचा राज्य शासनास अधिकार नसल्याची हरकत अड. विजय पाटील यांनी घेतली होती. त्यानतंर हे रस्ते हस्तांतरीत करण्याची प्रकीया सुरु झाल्याचे वृत्त आहे.