लेखकांनी विज्ञानाचा प्रवाही प्रसार करावा

0

जळगाव । सर्वच क्षेत्रात विज्ञानाने मोठी झेप घेतली असून, विज्ञानातील लागणार्‍या नवनवीन शोधांचा तरूणांना मोठ्या प्रमाणावर उपयोग होत आहे. या माध्यामातुन तरूणांनी विज्ञान विषयक कथा, नाटक, कविता यांचे लिखाण करायला हवे. प्रसार माध्यमे ही माहितीची गंगा असून, यातील अज्ञानाची घाण बाजुला करून, विज्ञान लेखकांनी विज्ञानाचा प्रसार आणखी प्रवाही करावा.असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर कुलकर्णी यांनी केले. मराठी विज्ञान परिषदेतर्फे आयोजित केलेल्या विज्ञान मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी केले.

मराठी विज्ञान साहित्य संमेलनाचे उद्घाटन
मराठी विज्ञान परिषदेतर्फे नुतन मराठा विद्यालयात तिसर्‍या मराठी विज्ञान साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाचे उद्घाटन लोकमत इ-आवृत्तीचे मुंबईचे संपादक चंद्रशेखर कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी मराठी विज्ञान परिषदेचे राज्य उपाध्यक्ष विवेक पाटकर, कार्यवाह अ.पा.देशपांडे,जळगाव विभागाचे उपाध्यक्ष एस.व्ही. सोमवंशी, कार्यवाह दीपक तांबोळी,सोमनाथ महाजन आदी उपस्थित होते. दुसर्‍या सत्रात मुंबई येथील संजय मेस्त्री यांनी एलसीडीच्या माध्यामाने विज्ञान व्यंगचित्रांचे सादरीकरण केले. तिसर्‍या सत्रात विज्ञान-कथा चर्चासत्रात प्रा.यशवंत देशपांडे, शरद पुराणिक, कॅप्टन सुनिल सुळे यांनी विज्ञान कथा त्यांचे विश्‍लेषण यांवर माहिती दिली. संमेलनाचे सुत्रसंचालन प्रा. राजेंद्र देशंमुख तर आभार दिलीप भांरबे यांनी मानले.संमेलन यशस्वीतेसाठी उप प्राचार्य आर. बी. देशमुख, प्रा. सुनील गरूड, प्रा. डी. पी. पवार, प्रा. राधिका सोमवंशी यांनी कामकाज पाहिले.